सिन्नरजवळ अपघातात सराफ व्यावसायिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:18 IST2021-02-27T04:18:03+5:302021-02-27T04:18:03+5:30
सिन्नरच्या गणेशपेठेत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजश्री कपोते यांचे सुनील ज्वेलर्स नावाने सराफ दुकान आहे. राजेंद्र कपोते ...

सिन्नरजवळ अपघातात सराफ व्यावसायिकाचा मृत्यू
सिन्नरच्या गणेशपेठेत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजश्री कपोते यांचे सुनील ज्वेलर्स नावाने सराफ दुकान आहे. राजेंद्र कपोते यांचा मुलगा शुभम हा दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुकान बंद करून नाशिक रोडकडे जात असताना सदर अपघात झाला. शुभम हा इंट्रिका कारने (क्रमांक एम.एच. १५ जी.ए. ४१४१) सिन्नरकडून नाशिककडे जात असताना त्याच दिशेने जाणाऱ्या कंटेनर (क्रमांक एच.आर. ५५ ए.टी. ११७२) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात शुभम गंभीर जखमी झाला. त्यास सिन्नर येथे रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले.
इन्फो
लवकरच होणार होता विवाह
शुभम हा राजेंद्र व राजश्री कपोते यांचा एकुलता एक मुलगा आहे. गेल्या महिन्यात शुभमचा साखरपुडा झाला होता. लवकरच त्याचा विवाह होणार होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने कपोते कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार पी.एन. मासुळे अधिक तपास करीत आहेत.
फोटो- २६ सिन्नर ॲक्सीडेंट-१/२
फोटो- मयत शुभम कपोते
फोटो- नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरजवळ झालेली अपघातग्रस्त इंट्रिका कार व कंटेनर.
===Photopath===
260221\26nsk_69_26022021_13.jpg~260221\26nsk_71_26022021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ सिन्नर ॲक्सीडेंट-१~फोटो- २६ सिन्नर ॲक्सीडेंट-२