सदाबहार चित्रपटगीतांची ‘सुनहरी यादे’ मैफल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:48 IST2019-05-19T00:47:13+5:302019-05-19T00:48:19+5:30
‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रमाचे.

सदाबहार चित्रपटगीतांची ‘सुनहरी यादे’ मैफल रंगली
नाशिक : ‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रमाचे.
परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.१८) आयोजित अविस्मरणीय चित्रपट गीतांच्या मैफीलीची जब जब बहार आयी या तकदीर चित्रपटातील गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर अजी रुठकर,‘मुझको इस रातकी तनहाई, ‘जिस दिल में बसा था’, ‘गर तुम भुला ना पाओगे’, ‘झिंदगी भर नहीं भूलेंगी, एहसान तेरा होगा आदी गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्फूर्त दाद दिली. उषा पाटेकर, जयंत पाटेकर, किशोर पाटेकर, सतिश कोठेकर, डॉ मनोज वावरे, विद्या कुलकर्णी, मयूर खोले या गायकांनी गितांचे सादरीकरण केले. अजय गांगुर्डे (ढोलक), अजय गायकवाड (आॅक्टोपॅड), रवी नागपुरे (तबला) यांनी साथसंगत केली. प्रीती जैन व प्रवीण पोतदार यांनी खास शैलीत निवेदन करताना संगीत मैफिलीत रंगत भरली.
दरम्यान, या कार्यक्रमात कला क्षेत्रात विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तबलावादक जयंत नाईक, अभिनेत्री हेमा जोशी, अभिनेते विजय साळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोका समूहाचे अध्यक्ष अशोक कटारिया, बाबाज थिएटरचे प्रशांत जुन्नरे, मधुकर झेंडे, मामा तांबे, राजेश पिंगळे, विजय भोसले आदि उपस्थित होते.