सुवर्णकार समाज संस्था, शतकोत्तर सुवर्णमहोत्सव
By Admin | Updated: June 8, 2017 18:07 IST2017-06-08T18:07:55+5:302017-06-08T18:07:55+5:30
अहिर सुवर्णकार समाज संस्थेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळा येत्या शनिवारी (दि.१०) सकाळी १० वाजता पंचवटीतील औरंगाबाद रोडवरील श्री सुवर्णलक्ष्मी नारायण लॉन्स याठिकाणी होणार

सुवर्णकार समाज संस्था, शतकोत्तर सुवर्णमहोत्सव
नाशिक : अहिर सुवर्णकार समाज संस्थेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळा येत्या शनिवारी (दि.१०) सकाळी १० वाजता पंचवटीतील औरंगाबाद रोडवरील श्री सुवर्णलक्ष्मी नारायण लॉन्स याठिकाणी होणार असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र मैंद यांनी दिली आहे.
संस्थेच्या १५० वर्षे पूर्तीनिमित्त श्री लक्ष्मी नारायण लॉन्स व मंगल कार्यालय, बहुद्देशीय प्रकल्प इमारत लोकार्पण सोहळा होणार असून, ‘सुवर्ण स्वप्नपूर्ती’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.