नाशिक : श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोठ यांच्या वतीने संस्थेच्या मंगल कार्यालयात प्रीती शहाणे हिचे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या विषयावर व्याख्यान झाले.नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त समाजाच्या वतीने विविध क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांमध्ये राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल तसेच उपक्रमशील विद्यार्थी म्हणून प्रीती शहाणे हिच्या सत्काराचे आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमेश लोळगे होते. याप्रसंगी सुनील महालकर, गिरीधर आडगावकर, राजेंद्र कुलथे, संजय मंडलिक, राजेंद्र सिंदेकर, प्रसाद आडगावकर, नितीन नागरे, राजेश नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुवर्णकार समाजाचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:03 IST