बोरस्ते विद्यालयात सुवर्ण महोत्सवाी सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 16:11 IST2020-01-05T16:10:46+5:302020-01-05T16:11:23+5:30
ओझरटाऊनशिप : येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ उत्साहात संपन्नझाला. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव भामरे यांनी अतिथीचे स्वागत केले.

सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मरणकिेचे प्रकाशन करताना व्यासपीठावर खासदार डॉ. भारती ताई पवार, नीलिमा पवार , माणिकराव बोरस्ते ,राघो अहिरे,तुषार शेवाळे, सुनील ढिकले आदी .
ठळक मुद्देलेझीम पथकाने नृत्य सादर करून स्वागत केले. संस्थे च्या ध्वजाचे ध्वजारोहण म.वि. प्र .समाजसंस्थेच्यासरचिटणीस निलिमापवार यांच्या हस्ते करण्यात आले.
समाज गीत ,ईश्वर स्तवन, स्वागत गीत , सादर केले. प्रास्तविक मुख्याध्यापक गुलाब भामरे ,तर प्रल्हाद गडाख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. खासदार डॉ भारतीताई पवार यांचा सत्कार निलिमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला. म. वि.प्र. समाजसंस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळ,े चिटणीस डॉ.सुनील ढिकले, राघो नाना अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वसंत गवळी, आर. एस. आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या विद्यालयाचा माजी विद्यार्थी पंकज पवार तहसीलदार यांचा सत्कार माणिकराव बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरेखा ठाकरे यांनी आभार मानले.