धावपटू सोनू नवरे यांना पुन्हा गोल्ड मेडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:41 IST2019-12-12T18:39:57+5:302019-12-12T18:41:38+5:30
ब्राह्मण गाव : येथील आदिवासी युवक धावपटू सोनू केवळ नवरे याची पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली.

मालेगाव येथील एम.एस.जी विद्यालयातर्फेधावपटू सोनू नवरे यांचा सत्कार करताना प्राचार्य दिनेश शिरोडे, समवेत उपप्राचार्य निकम, प्रा. के. एन. अहिरे आदी.
ठळक मुद्देमालेगाव एमएसजी कालेज मध्ये सत्कार
ब्राह्मण गाव : येथील आदिवासी युवक धावपटू सोनू केवळ नवरे याची पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याला स्पर्धेत पाच किलोमीटर रनिंगमध्ये गोल्ड मेडल मिळाले. त्याबद्दल मालेगाव येथील एम.एस.जी विद्यालयातर्फेसोनू नवरे याचा प्राचार्य दिनेश शिरोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य निकम, प्रा. के. एन. अहिरे आदी उपस्थित होते. तसेच चीनमधील होणाºया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी धावपटू सोनू नवरे याची निवड करण्यात आली.