रविशंकर मार्गावर सोनसाखळी ओरबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:17 IST2021-03-09T04:17:55+5:302021-03-09T04:17:55+5:30

---- डोक्यात पान्हा मारला नाशिकरोड : पाणी मारण्याचे पैसे गाववाल्यांनी दिल्यावर देतो, असे सांगितल्याचा राग आल्याने युवकाच्या डोक्यात ...

A gold chain was found on Ravi Shankar Marg | रविशंकर मार्गावर सोनसाखळी ओरबाडली

रविशंकर मार्गावर सोनसाखळी ओरबाडली

----

डोक्यात पान्हा मारला

नाशिकरोड : पाणी मारण्याचे पैसे गाववाल्यांनी दिल्यावर देतो, असे सांगितल्याचा राग आल्याने युवकाच्या डोक्यात वाहनाचे चाक खोलण्याचा लोखंडी पान्हा मारुन जखमी केल्याची घटना घडलरी.

कोटमगाव येथील योगेश दत्तु घुगे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास हॉटेल राधिकामागे फॉरेस्टमधील सुरक्षा केबिनजवळ उभा होतो. यावेळी संशयित भानुदास उर्फ चंद्रभान घुगे रा.कोटमगाव याने योगेश घुगे यांच्याकडे गावात पाणी मारल्याचे पैसे मागितले. योगेशने गाववाल्यांनी पैसे दिल्यावर पैसे देतो असे सांगितले. त्याचा भानुदास याला राग आल्याने त्याने शिवीगाळ करत बोलेरो गाडीतून लोखंडी पान्हा काढून योगेशच्या डोक्यात मारुन जखमी केले. यावेळी झालेल्या झटापटीत योगेशच्या खिशातील 38 हजार रुपये गहाळ झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

----

तडीपार गुंडाला अटक

नाशिकरोड : जेलरोड पाण्याच्या टाकीजवळ शिवगंगा अपार्टमेंमध्ये राहणारा सुरेश राजाराम म्हस्के याला पोलिस प्रशासनाने शहर व जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते. रविवारी रात्री नाशिकरोड पोलिस तडीपार केलेल्या इसमांची व त्यांच्या घराची तपासणी करत होते. सुरेश म्हस्के हा पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी नसताना व तडीपार केलेले असतानाही घरीच आढळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A gold chain was found on Ravi Shankar Marg