शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

खरेदीचा बनाव करत सोनसाखळी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:53 IST

इंदिरानगरसह म्हसरूळ, पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी चोरीचा धडाका लावल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना थेट ‘ओपन चॅलेंज’ केले आहे की काय अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे. म्हसरूळ परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे.

ठळक मुद्देइंदिरानगरसह पंचवटी, म्हसरूळ ‘टार्गेट’; पंधरवड्यात तिसरी घटना

पंचवटी : इंदिरानगरसह म्हसरूळ, पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी चोरीचा धडाका लावल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना थेट ‘ओपन चॅलेंज’ केले आहे की काय अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे. म्हसरूळ परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे. पंधरवड्यात तीन महिलांना आपले मंगळसूत्र गमवावे लागल्याने पोलिसांच्या कारभाराविषयीदेखील शंका घेतली जात आहे. हेडफोन खरेदीचा बहाणा करत दुकानात येऊन महिला दुकानदाराच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी ओरबाडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून म्हसरूळला स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन केले गेले. कारण त्या भागात वाढत्या लोकसंख्येमुळे नवनवीन कॉलन्यांच्या परिसरात गुन्हेगारीची पाळेमुळे घट्ट होऊ लागली होती. स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती, मात्र या भागात गुन्हेगारी अधिकच फोफावल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणूक आचारसंहिता व सणासुदीच्या काळात सोनसाखळी चोर सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढताना दिसत आहेत.म्हसरूळ येथे राहणाऱ्या मीना नवनीतलाल त्रिवेदी यांचे म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर दुकान आहे. दोघे इसम एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दुकानासमोर आले. त्यातील एकाने दुकानात येऊन हेडफोन खरेदी करण्याचा बहाणा करत त्रिवेदी यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून पळ काढला.नाशिकरोडलाही दोन ठिकाणी मंगळसूत्र ओरबडलेनाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.४जेलरोड जुना सायखेडारोड हॉली फ्लॉवर शाळेच्या पाठीमागे राहणाºया अनिता भूषण गवळी व त्यांच्या शेजारी राहणाºया स्वाती झांबरे या गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण करून घराच्या परिसरात शतपावली करत होत्या. अभिनव शाळेजवळून पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी अनिता गवळी यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेले.४दुसºया घटनेत जेलरोड टाकेकर वसाहत श्रीहरी विठ्ठल सोसायटी येथे राहणाºया रत्ना भगवान जाधव या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास टाकेकर वसाहत येथे भाजीपाला घेऊन रस्त्याने घरी जात होत्या. सैलानीबाबा दर्ग्यासमोर दुचाकीवर उभ्या असलेल्या दोघा चोरट्यांनी रत्ना जाधव यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड भागात एका पाठोपाठ दोन ठिकाणी मंगळसूत्र ओढून चोरून नेल्याची घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.सोनसाखळी चोरी४ शतपावलीसाठी बाहेर आलेल्या सुनंदा हरी अंबेकर (५३) यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हिरावाडीरोडवरील विधातेनगर परिसरात घडली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरी