तोतया पोलिसांनी लांबविल्या सोन्याच्या बांगड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:18 IST2021-08-12T04:18:33+5:302021-08-12T04:18:33+5:30
सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी ओमनगर येथील खोडियार निवासमध्ये राहणाऱ्या सुशीला सुरेश गुजराती यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ...

तोतया पोलिसांनी लांबविल्या सोन्याच्या बांगड्या
सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी ओमनगर येथील खोडियार निवासमध्ये राहणाऱ्या सुशीला सुरेश गुजराती यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गुजराती या मंदिरातून घराकडे पायी जात असताना एका बंगल्याच्या बाहेर दुचाकीवरून आलेल्या एकाने ‘आम्ही पोलिस आहोत, तुम्ही अंगावर एवढे दागिने घालून का फिरत आहात? दागिने काढून तुमच्या पिशवी ठेवा, असे सांगितले. त्यानंतर गुजराती यांनी हातातील बांगड्या काढून संशयिताच्या हातात दिल्या त्याने त्या पिशवीत ठेवण्याचा बहाणा करत लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर गळ्यातील सोनसाखळी काढण्यास सांगितले मात्र गुजराती यांनी गळ्यातील सोनसाखळी काढली नाही. त्यानंतर संशयिताच्या जोडीदाराने त्या ठिकाणी येऊन, हो हे पोलीस आहेत, असे सांगून दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले. काही मिनिटांनी गुजराती यांनी पिशवी तपासली असता
त्यात सोन्याच्या बांगड्या दिसल्या नाहीत. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला. भरदुपारी बनावट पोलिसांकडून झालेल्या लुबाडणुकीचा प्रकार कानावर येताच अस्सल पोलीसदेखील चक्रावून गेले. पोलिसांनी तत्काळ गस्ती पथकाला बिनतारी संदेश यंत्रणेवरून ‘अलर्ट’ धाडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.