जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी रौंदळउपाध्यक्षपदी गोलाईत बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:45 IST2020-10-19T17:43:54+5:302020-10-19T17:45:16+5:30
सटाणा : नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी बागलाणचे संचालक शिवाजी रौंदळ यांची तर उपाध्यक्षपदी योगेश गोलाईत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी रौंदळ यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करतांना आमदार दिलीप बोरसे समवेत ब्राम्हणगावचे माजी सरपंच किरण अहिरे, विनोद अहिरे.nashik
सटाणा : नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी बागलाणचे संचालक शिवाजी रौंदळ यांची तर उपाध्यक्षपदी योगेश गोलाईत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जेष्ठ संचालक संपतराव सकाळे यांनी मजूर संघाच्या अध्यक्षपदाचा तर प्रतिभा शिरसाठ यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रिक्तपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत अध्यक्षपदासाठी बागलाणचे संचालक शिवाजी रौंदळ तर उपाध्यक्षपदासाठी योगेश गोलाईत यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उपरोक्त पदांसाठी दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी रौंदळ तर उपाध्यक्षपदी गोलाईत यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष रौंदळ यांचा सत्कार मावळते अध्यक्ष सकाळे यांनी केला. तर उपाध्यक्ष गोलाईत यांचा सत्कार शिरसाठ यांनी केला .याप्रसंगी संचालक राजेंद्र भोसले, मुन्ना हिरे, प्रतिभा शिरसाठ, सतीश देशमुख आदी उपस्थित होते.