दहीपुलाकडे जाताय? सावधान! खड्ड्यांबरोबरच जिवालाही धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:51+5:302021-07-22T04:10:51+5:30
नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित होतो. खड्डे बुजवण्यावर सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्च होतात. यंदा त्यात स्मार्ट सिटीने ...

दहीपुलाकडे जाताय? सावधान! खड्ड्यांबरोबरच जिवालाही धोका
नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित होतो. खड्डे बुजवण्यावर सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्च होतात. यंदा त्यात स्मार्ट सिटीने गावठाणात खोदलेले रस्ते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने अन्य भागात खोदून ठेवलेले रस्ते यंदा सर्वाधिक अडचणीचे ठरले आहेत. जेथे रस्ते बुजवले तेथेही रस्ते चालवणे अवघड ठरले आहे.
इन्फो..
वाहनांचा खर्च वाढला, पाठदुखीही वाढली!
कोट...
शहराच्या मध्यवस्तीत प्रवास करणे म्हणजे एक संकट ठरले आहे. मध्य नाशिकमध्ये दुचाकी घेऊन जाणे अडचणीचे आहे. याशिवाय किनारा हॉटेलजवळील कच्चा रोड येथून तर वाहन नेण्यास मनाई करणारे फलक लावले पाहिजे. वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
- योगेश वाघमारे, व्दारका
कोट...
मुख्य रस्ते सोडले तर शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहन तर चालवता येत नाहीच, शिवाय पाठीचा आजार होण्याची शक्यता आहे.
- श्रीकांत घरटे, भाभानगर
कोट...
पावसाळ्यामुळे खड्डे पडत असले तरी दरवर्षी ते दुरुस्त करण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार ते दुरुस्तही केले जातात. शहरातील काही भागात स्मार्ट सिटी आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने ते रस्ते खेादले असले तरी आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांना पावसाच्या अगोदरच कामे थांबवण्यास सांगितले होते.
- संजय घुगे, शहर अभियंता, नाशिक महापालिका
इन्फो...
या रस्त्यांवर गती कमी ठेवलेलीच बरी!
१) जुन्या किनारा हॉटेलजवळील शिवाजीवाडीकडे जाणारा रस्ता हा कच्चा असून, त्या ठिकाणी वाहन सोडाच परंतु पायी चालणेदेखील अवघड बनले आहे.
२) आडगाव पोलीस ठाण्याजवळील रस्तादेखील अडचणीचा असून, त्या ठिकाणीदेखील खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने जत्रा हॉटेल मार्गावरून सांभाळून जावे लागते.
३) उपनगरकडून जेलरोडकडे जाणाऱ्या जुन्या सायखेडा रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत.
४) विहितगाव-वडनेर रोड आधीच अरूंद आहेत. त्यात अवजड वाहतूक त्यात हाेत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
५) बडदेनगर ते पाटीलनगर रस्त्याचे काम अर्धवट असून ते पूर्ण होत नसल्याने नागरिकांना खड्ड्यांतून जावे लागत आहे.
कोट...
खड्ड्यांमुळे केवळ वाहनांनाच नव्हे नागरिकांना शारीरिक अपायदेखील हाेतात, वाहन चालवताना दणके बसून अनेकांना मणक्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
- डॉ. चोकसी, अस्थिरोगतज्ज्ञ
----
मुख्य फोटो...२०/१०६
दोन फोटो पैकी एक २०/१०३
२१ सिडको नावाने