नाशिक पश्चिममधून गोडसेंना मताधिक्य
By Admin | Updated: May 17, 2014 14:50 IST2014-05-17T00:04:57+5:302014-05-17T14:50:02+5:30
सहा बूथवर आघाडी

नाशिक पश्चिममधून गोडसेंना मताधिक्य
सहा बूथवर आघाडी
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण ३१३ बूथ होते. यापैकी बूथ क्रमांक ५० ते ५५ येथेच आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांना मतांची आघाडी मिळाली. इतर सर्वच बूथवर शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनीच पहिल्या क्रमांकाची मते मिळविली.
उत्तमनगर येथील एकमेव बूथवर आघाडी
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एकूण ३१३ बूथपैकी मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना सिडकोतील उत्तमनगर येथील एका बूथवरच (मते-८६) मताधिक्य मिळविता आले तर ३१३ या सर्वच बूथपैकी एकाही बूथवर डॉ. पवार यांना तीन अंकी आकडा गाठता आला नाही.