नाशिक : शहराची जीवन गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रुपडे आता पालटणार असून, घारपुरे घाट ते होळकर पुलाजवळ लेझर अॅँड साउंड शो, हेरिटेज वॉक तसेच रामायणातील प्रसंगांना उजाळा देणाºया मूर्तिकलांनी ते आता नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे, तर गोदावरी नदीचे प्रदूषण थांबवितांनाच रामकुंडावर शुद्ध पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी, कॉँक्रीटीकरण हटविण्यासह धोबीघाटाला मनाईबरोबरच सुशोभीकरण करण्यात येईल, त्याचबरोबर धोबीघाट बंद करण्यात येणार असून, मोदकेश्वर पटांगणावरदेखील विविध रंजक अॅक्टिव्हिटी असणार आहेत.मनपाच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून याबाबतचे सादरीकरण शनिवारी (दि.१७) पं. पलुस्कर सभागृहात करण्यात आले. यावेळी ही माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोेजेक्ट गोदा तयार करण्यात आला असून, त्याची माहिती अधिकाºयांनी दिली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, दिनकर पाटील, शाहु खैरे, गुरुमितसिंग बग्गा तसेच अॅड. वैशाली भोसले व जगदीश पाटील, वत्सला खैरे आदी उपस्थित होते.नाशिक शहराला सोळा किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे. महापालिकेने प्रोजेक्ट गोदावरी अंतर्गत तीन भाग केले असून, पहिल्या टप्प्यात घारपुरे घाट ते होळकर पुलादरम्यान तयार करण्यात आलेल्या गोदापार्कचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे.नौकाविहाराची होणार सोयस्मार्ट सिटीचाच एक भाग म्हणून सुंदर नारायण मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्यात आणि गोदापार्कचे साधर्म्य हावे यासाठी नदी ओलांडण्यासाठी होळकर पूल ते घारपुरे घाटाजवळील मनोरंजनाच्या क्षेत्रात जाण्यासाठी नौकानयन करून जाता येणार आहे.
गोदाकिनारी लेझर शो, हेरिटेज वॉक, रामायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:47 IST
शहराची जीवन गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रुपडे आता पालटणार असून, घारपुरे घाट ते होळकर पुलाजवळ लेझर अॅँड साउंड शो, हेरिटेज वॉक तसेच रामायणातील प्रसंगांना उजाळा देणाºया मूर्तिकलांनी ते आता नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे, तर गोदावरी नदीचे प्रदूषण थांबवितांनाच रामकुंडावर शुद्ध पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी, कॉँक्रीटीकरण हटविण्यासह धोबीघाटाला मनाईबरोबरच सुशोभीकरण करण्यात येईल, त्याचबरोबर धोबीघाट बंद करण्यात येणार असून, मोदकेश्वर पटांगणावरदेखील विविध रंजक अॅक्टिव्हिटी असणार आहेत.
गोदाकिनारी लेझर शो, हेरिटेज वॉक, रामायण
ठळक मुद्देप्रोजेक्ट गोदा : तीन टप्प्यांत होणार विकास