सप्तश्रृंगगडावर ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 02:43 PM2019-10-03T14:43:09+5:302019-10-03T18:02:38+5:30

पांडाणे -साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ संबोधले जाणाऱ्या सप्तशृंगी देविचा शारदीय नवरात्र उत्सवात गुरूवारी सकाळी नऊ वाजता ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा करण्यात आली .

Goddess Maha Puja for the Lal Panchami on Saptashringa | सप्तश्रृंगगडावर ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा

सप्तश्रृंगगडावर ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा

Next

पांडाणे -साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ संबोधले जाणाऱ्या सप्तशृंगी देविचा शारदीय नवरात्र उत्सवात गुरूवारी सकाळी नऊ वाजता ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा करण्यात आली .
ललीत पंचमीनिमीत्यांने महापुजा अ‍ॅड अविनाश भिडे यांनी केली. देवीचे पुजारी गौरव देशमुख , राजेंद्र दिक्षीत ,व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
देवीला पिवळ्या रंगाचा अकरा वारी पैठणीने तिन मिटरची कंचोळी असून त्यामुळे देविचे रु प अधिक खुलून दिसत होते. ललीत पंचमीच्या माळेनुसार भगवतीला हिरे , माणिक मोतीचा सोनेरी मुकूट , गळ्यात पुतळीहार , कोथरी हार , मंगळसुत्र , कर्णफुले, नथ , सोन्याचा कंबर पट्टा, पायात सोन्याचे तोडे , सुवर्ण पाऊल ,निंबूची माळ ,सुवर्ण पादुका तसेच नागीन पानाचा सुंदर दिसनारा हार असे अलंकारांनी भगवतीचे रु प खुप देखणे व खुलून दिसत होते .
गडावर भाविकांच्या सेवेसाठी मराठा बटालीयनचे ऐंशी , आपत्ती व्यवस्थापन ७५ न्यासाचे ३९ व अनुरु ध्द आश्रमाचे दोनशे असे एकून तिनशे चौ्या ऐंशी स्वयंसेवक सेवा बजावत असल्याचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी सांगितले .
यात्रा काळात नांदूरी पायथ्याजवळ चोख पोलीस बंदोबस्त असून वाहतुक शाखेचे कर्मचारी भाविकांना आपले वाहन पार्किंला लावून आपले पैसे व मौलवान वस्तू सांभाळण्याचे आवाहन करित आहेत.

Web Title: Goddess Maha Puja for the Lal Panchami on Saptashringa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक