शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

दमदार संततधारेने गोदामाईचा जलोत्सव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:14 AM

जून महिना उजाडल्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा सोमवारी (दि.१६) संपली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी व शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी या हंगामात पहिल्यांदा दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितली. दुपारनंतर गोदावरीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली होती.

नाशिक : जून महिना उजाडल्यापासून नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती, ही प्रतीक्षा सोमवारी (दि.१६) संपली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी व शहरात दिवसभर कोसळणाऱ्या दमदार संततधारेने गोदावरी या हंगामात पहिल्यांदा दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितली. दुपारनंतर गोदावरीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली होती. रात्री ८ वाजेपर्यंत नऊ हजार ३०२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुती पुरात बुडाला.  शनिवारी पहाटेपासून शहरासह जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, गंगापूर धरणाचा जलसाठा या पंधरवड्यात ६० टक्क्यांनी वाढून सोमवारी संध्याकाळपर्यंत ७८ टक्क्यांवर पोहचला होता. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग, शहरातील पावसाचे पाणी उपनद्या, नाल्यांमधून येणारे पाणी यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी प्रचंड वाढली होती. दुपारी २ वाजेपासून अग्निशामक दलाच्या जवानांकडून नदीकाठालगत सतर्क तेच्या सूचना दिल्या जात होता. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी लागले होते. देवमामलेदार मंदिरासह गंगा-गोदावरी प्राचीन मंदिर व नारोशंकर मंदिरातही पाणी शिरले होते. तसेच नीळकंठेश्वर महादेव मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला होता. गोरेराम मंदिराच्या खालील बाजूच्या आठ पायºया पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. दुपारी २ वाजता चार हजार ७१६ क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते.नऊ हजार क्यूसेकचा विसर्गनदीचे सर्वच लहान पूल पाण्यामध्ये हरविले होते. नदीचा वाढता जलस्तर लक्षात घेता विक्रेत्यांनी तातडीने दुकाने हटवून घेतली. संध्याकाळी ६ वाजता दुतोंड्या मारुतीच्या मानेला पुराचे पाणी लागले. गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग सात हजार ६२ क्यूसेकवर पोहचला होता.रात्री ८ वाजता पुन्हा विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीपात्रात नऊ हजार ३०२ क्यूसेक इतके पाणी प्रवाहीत झाले होते. त्यामुळे दुतोंड्या मारूतीची मूर्ती पुराच्या पाण्यात बुडाली. मध्यरात्री पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी कायम राहिल्यास विसर्ग अधिक वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.हंगामातील उच्चांक  नोंदशनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला असला तरी शहरात सोमवारी या हंगामातील पावसाची उच्चांकी नोंद करण्यात आली. दिवसभरात सकाळी साडेआठ वाजेपासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत २२.१ मि.मी. इतका पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आली. तसेच हवामान खात्याने २१ मि.मी. इतका पाऊस नोंदविला. रविवारी संध्याकाळपर्यंत १८.२ मि.मी. तर शनिवारी संध्याकाळपर्यंत २.४ मि.मी. इतका पाऊस नोंदविला गेला होता; मात्र शनिवारी संध्याकाळनंतर जोर वाढल्याने रात्री आठ वाजेपर्यंत १४ मि.मी. पर्यंत पाऊस मोजला गेला.‘अलर्ट’मुळे टळले नुकसान सोमवारी दुपारपासून महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयासह पंचवटी उपकेंद्राच्या बंबाद्वारे जवानांकडून गोदाकाठावर नागरिकांना सतर्क केले जात होते. यामुळे विक्रेते वेळीच सावध झाले आणि त्यांनी दुकानांमधील माल हटविण्यास प्रारंभ केला होता. संध्याकाळपर्यंत रामकुंड येथील कपालेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, सांडव्यावरचे देवी मंदिर, अर्धनारी नटेश्वर मंदिराचा सर्व परिसर रिकामा झाला होता. रात्री उशिरा वाढणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता शहरातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होेती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर