भगूरला किराणा दुकानदारास गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:51 IST2018-08-11T00:51:15+5:302018-08-11T00:51:48+5:30

नाशिक : भगूर येथे एका ग्राहकाने वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी किराणा घ्यायचा असल्याचे सांगून केवळ अकराशे रुपये जमा करून महिला किराणा दुकानदारास ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

The goddess Bhagur is a grocery shop owner | भगूरला किराणा दुकानदारास गंडा

भगूरला किराणा दुकानदारास गंडा

नाशिक : भगूर येथे एका ग्राहकाने वडिलांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी किराणा घ्यायचा असल्याचे सांगून केवळ अकराशे रुपये जमा करून महिला किराणा दुकानदारास ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
क्रांती चौकातील अलकनंदा द्वारकानाथ बूब या किराणा व्यावसायिक महिलेच्या फिर्यादीनंतर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज ठाकरे नामक तरुण ग्राहकाने नानेगाव रोडवरील समर्थ विहार सोसायटीत राहत असल्याचे सांगत वडिलांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी किराणा माल घ्यायचा आहे. अशी बतावणी करून २९ हजार ८५८ किमतीचा किराणा माल घेतला. त्या बदल्यात केवळ ११०० रुपये रोख देऊन बाकी रक्कम कोणाला तरी घरी पाठवा त्याच्याकडे देतो असे सांगून किराणा माल घेऊन फरार झाला. किराणा व्यावसायिक बूब यांनी काही वेळानंतर सदर संशयिताने दिलेल्या पत्त्यावर भेट दिली असता अशी व्यक्ती येथे राहत नसल्याचे कळल्याने त्यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली.

Web Title: The goddess Bhagur is a grocery shop owner