शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी वेबसाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:22 AM

गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लढ्याला पाठबळ देणारा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून, त्यानुसार प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी लोकांचा व्यापक सहभाग असलेली वेबसाइट सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक : गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लढ्याला पाठबळ देणारा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून, त्यानुसार प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी लोकांचा व्यापक सहभाग असलेली वेबसाइट सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यावर नागरिक तक्रारी करू शकतील आणि त्यावरील कार्यवाहीचा अहवाल तीन दिवसांत याच वेबसाइटवर टाकणे बंधनकारक करण्यात आल्याने प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.दक्षिण गंगा मानल्या जाणाºया गोदावरी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी या मुद्द्याला हात घातला. गोदावरीत होणारे प्रदूषण अनेक प्रकारचे असून, शहरातील सांडपाणी तसेच औद्योगिक सांडपाणी आणि नागरिकांकडून होणारे अन्य प्रकारचे प्रदूषण असे अनेक घटक आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोदावरी गटारीकरणविरोधी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल देतानाचा उच्च न्यायालयानेच वेबसाइट तयार करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील उच्चस्तरीय समितीला दिले आहेत. ही समिती उच्च न्यायलयानेच गठीत केली असून त्यांच्यामार्फत वेबसाइटचे संचलन होणार आहे.गेल्याच महिन्यात यासंदर्भात आदेश देण्यात आले असल्याने विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात बैठक झाली आहे.तीन आठवड्यांत निराकरण : त्र्यंबक ते नांदूरमधमेश्वरचा समावेशगोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर ते नांदूर मधमेश्वरपर्यंतच भाग आदेशात समावेश करण्यात आला आहे. या भागातील प्रदूषण आणि नदीची सद्यस्थितीची सर्व माहिती या वेबसाइटवर असेल तसेच गोदावरी नदीसंदर्भातील तसेच अन्यही नदी आणि पर्यावरण विषयक ज्या घडामोडी देशात आणि जगात होतील त्यासंदर्भातील सर्व माहिती आता या वेबसाइटवर टाकणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यात नदीचे महत्त्व किंवा पर्यावरण याविषयावरील लेखही प्रसिद्ध करण्याची सोय असेल सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोदावरी प्रदूषणासंदर्भात कोणताही जागरूक नागरिक या वेबसाइटवर तक्रार करू शकतील आणि त्याचे निराकरण तीन आठवड्यांत करून त्यासंदर्भातील माहिती पुन्हा वेबसाइटवर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखालील उच्चाधिकार समितीला वेबसाइट बनविण्यास सांगितली आहे. देशपातळीवर अशाप्रकारे प्रथमच वेबसाइटद्वारे नदीचे पर्यावरण राखण्याचा प्रयत्न होणार आहे. मुख्यत्वे म्हणजे त्यात नागरिकांना सामावून घेतले जाणार आहे. त्यांच्याकडील तक्रार किंवा माहितीचे आदान-प्रदान ते करू शकतील.- राजेश पंडित, याचिकाकर्ता

टॅग्स :godavariगोदावरीpollutionप्रदूषण