दीड वर्षापासून गोदावरी एक्स्प्रेस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:18 IST2021-09-07T04:18:02+5:302021-09-07T04:18:02+5:30
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. मागील ३० ...

दीड वर्षापासून गोदावरी एक्स्प्रेस बंद
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. मागील ३० वर्षांपासून सुरू असलेली गाडी मनमाडऐवजी इतरत्र हलवण्याची योजना चालू आहे. याबाबत मंत्री महोदयांनी विरोध करून गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत मनमाड येथून लवकरात लवकर सुरू करावी. सदर गाडी ही लासलगावसाठी जीवनवाहिनी आहे. आधीच कोरोना काळात चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात गोदावरी एक्स्प्रेस बंद झाल्यास नाशिक व इतरत्र मजुरीसाठी जाणाऱ्या लोकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पुढाकार घेऊन गोदावरी एक्स्प्रेस लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी लासलगाव येथील नागरिकांनी फलकाद्वारे केली आहे. यावेळी संदीप उगले, राजेंद्र कराड, मयूर झांबरे, बापू कुशारे, भगवान बोराडे, चंद्रकांत नेटारे, ॲड. नंदू फसाले, अक्षय जगताप, हमीद शेख, पीयूष बकरे, मंगेश रोटे, दत्ता जगताप, हमीद शेख, भरत गिते आणि परिसरातील प्रवासी नागरिक उपस्थित होते.
फोटो- ०६ गोदावरी एक्स्प्रेस
060921\06nsk_18_06092021_13.jpg
फोटो- ०६ गोदावरी एक्सप्रेस