शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

By admin | Updated: August 1, 2014 01:10 IST

गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

कसबे सुकेणे : दारणा व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आज गुरुवारी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. चांदोरी, सायखेड्यासह गोदाकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, काठालगतच्या शेतांमध्ये पूरपाणी घुसले आहे.सोमवार व मंगळवारी झालेल्या धुव्वाधार पावसामुळे दारणा धरणातून मंगळवारी संध्याकाळी २० हजार क्युसेक, तर गंगापूर धरणांतून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाकाठावर पूरस्थिती निर्माण झाली. चांदोरी- सायखेडा गावांना जोडणाऱ्या पुलापर्यंत पाणी पोहोचल्याने नागरिकांची धावपळ उडाली. नदीत वाहून आलेल्या पाणवेली अडकल्याने पाण्याच्या प्रवाहात अडचणी निर्माण झाल्या होत्या. चाटोरी, सायखेडा, चांदोरी शिंगवे आदिंसह गोदाकाठालगतच्या शेतीत पूरपाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गोदाकाठाने सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.दिंडोरी तालुक्यात झालेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बाणगंगेला बुधवारी पहिला पूर आला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहू लागले आहे. बाणगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी बाणगंगेला मोठा पूर आला. या पावसाळ्यातील पहिला पूर आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती. पुराचे पाण्याच्या वेग मोठा असल्याने या पुरात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाहून गेल्या. ओणे गावाच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने ओणे गावाचा ओझर-सुकेणेशी संपर्क तुटला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. (वार्ताहर)