महापालिकेत गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित : प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार
By Admin | Updated: March 29, 2017 22:06 IST2017-03-29T22:06:56+5:302017-03-29T22:06:56+5:30
गोदावरी नदीपात्र व परिसराचे संवर्धन तसेच प्रदूषणमुक्तीसाठी महापालिका आयुक्तांनी गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केला

महापालिकेत गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित : प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार
नाशिक : गोदावरी नदीपात्र व परिसराचे संवर्धन तसेच प्रदूषणमुक्तीसाठी महापालिका आयुक्तांनी गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केला असून, कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोदावरी नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी यापूर्वीच काही कठोर उपाययोजनेचे आदेश दिले आहेत. त्यात जबर दंडात्मक कारवाईचा समावेश आहे. गोदावरी नदीपात्र व परिसराच्या संवर्धनासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या प्रमुखपदाची धुरा उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, श्रीमती निर्मला गायकवाड यांच्याकडे सहायक आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.