गोदाकाठच्या ग्रामपंचायतींची आंदोलनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST2021-06-09T04:17:35+5:302021-06-09T04:17:35+5:30
याप्रश्नी लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास गोदाकाठच्या सर्व गावांना एकत्र करून नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयात व प्रदूषण नियंत्रण मंडळात ...

गोदाकाठच्या ग्रामपंचायतींची आंदोलनाची तयारी
याप्रश्नी लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास गोदाकाठच्या सर्व गावांना एकत्र करून नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयात व प्रदूषण नियंत्रण मंडळात खेचण्याचा इशाराही देण्यात आला आहे. लवकरच याप्रश्नी ‘प्रदूषण हटाव, गोदावरी बचाव’ मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांनी सांगितले. तर लाखलगाव व गंगापाडळी गावालगत गोदावरीचे दूषित पाणी मुक्या जनावरांनाही पिता येत नसल्याची तक्रार लाखलगावचे उपसरपंच आत्माराम दाते यांनी केली आहे. गोदावरीत दूषित पाणी सोडण्याबाबत मनपाच्या मलजल शुध्दीकरण केंद्राविषयी शंका येत असल्याची प्रतिक्रिया गंगावाडीतील अतुल धनवटे यांनी व्यक्त केली आहे.(फोटो ०८ वेली)
एकलहरे येथील वीज केंद्राच्या बंधाऱ्यातील पाणवेलींची पाहणी करताना माजी सरपंच राजाराम धनवटे, सागर जाधव, अशोक राजोळे आदी.