बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:55 IST2019-10-19T23:43:26+5:302019-10-20T00:55:14+5:30
गंगापूर गावाजवळील जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील देवीदास नेहरे यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले

बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार
गंगापूर : गंगापूर गावाजवळील जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील देवीदास नेहरे यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी सरपंच हिराबाई भगवान गभाले यांनी केली आहे.
जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील नेहरे यांच्या मळ्यातील घराजवळून भर दिवस बिबट्याने बोकड पळवून नेत ठार केले. याबाबत वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी ओंकार देशपांडे, सचिन आहेर तसेच जलालपूरचे पोलीस पाटील पप्पू मोहिते घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा के ला. याबाबतच्या भरपाईची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. परिसरातील बिबट्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता वनविभागाने ठोस कारवाई करीत बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.