आज बकरी ईद घरातच साजरी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 00:59 IST2020-07-31T23:55:26+5:302020-08-01T00:59:15+5:30
कोरोना संक्रमणाचा फैलाव शहर व परिसरांत अधिक वेगाने होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर समाजबांधव सामूहिकरीत्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपापल्या घरीच नमाजपठण करणार आहेत.

आज बकरी ईद घरातच साजरी होणार
नाशिक : कोरोना संक्रमणाचा फैलाव शहर व परिसरांत अधिक वेगाने होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर समाजबांधव सामूहिकरीत्या ईदगाह मैदान किंवा मशिदींमध्ये एकत्र न येता आपापल्या घरीच नमाजपठण करणार आहेत.
बकरी ईद शनिवारी (दि.१) शहरात साजरी केली जाणार असून सध्या अनलॉकची स्थिती जरी असली तरी सामूहिकरीत्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर असलेल्या बंदीचे समाजबांधवांकडून पालन केले जाणार आहे.
शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर होणाऱ्या बकरी ईदच्या नमाज पठणाचा सामूहिक सोहळा रद्द करण्यात आला आहे. आपापल्या घरांमध्येच नमाजपठण करावे. शासनाच्या कुठल्याही नियमांचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन हिसामुद्दीन खतीब यांनी समाजाला केले आहे.