नाशिकचे वैभव - कावनई किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST2021-07-20T04:11:38+5:302021-07-20T04:11:38+5:30
निजामशाहीत असणारा हा किल्ला इ.स. १६३५ - ३६ च्या सुमारास मोगलांनी जिंकून घेतला होता. त्यानंतर इ.स. १६७० -७१ च्या ...

नाशिकचे वैभव - कावनई किल्ला
निजामशाहीत असणारा हा किल्ला इ.स. १६३५ - ३६ च्या सुमारास मोगलांनी जिंकून घेतला होता. त्यानंतर इ.स. १६७० -७१ च्या सुमारास हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे १६८८ च्या सुमारास पुन्हा हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु याविषयी ठोस पुरावे आढळत नाही. त्यामुळेच नंतर हा किल्ला मराठ्यांकडे केव्हा आला याचीही नोंद सापडत नाही. कावनईला जाण्यासाठी घोटीमार्गाने वैतरणाच्या दिशेने जावे लागते. या रस्त्यावर काही अंतर पुढे गेल्यानंतर उजवीकडे वळणारा रस्ता कावनईत जातो. या कावनई फाट्यापासून १ तासाचे अंतर चालूनही कावनई गावात पोहचता येते. वाहनाने १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. किल्ल्याच्या पायथ्याला कावनई गाव आहे. गावात प्रवेश करताच उजव्या हातालाच किल्ला दिसतो. गावापासून किल्ल्यावर चढण्यासाठी एक तास पुरतो. किल्ल्यावरून कळसूबाई रांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा सर्व परिसर दिसतो.
190721\19nsk_9_19072021_13.jpg
कावनई किल्ला