नाशिकचे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:45+5:302021-08-20T04:19:45+5:30

गोदेतील रामकुंडानजीक असलेल्या उंच टेकडीवर पूर्वी एक गुहा होती.सुमारे ११०० च्या सुमारास गुहेतील शिवलिंगासभोवती कुणा गवळी राजाने छोटे मंदिर ...

The glory of Nashik | नाशिकचे वैभव

नाशिकचे वैभव

गोदेतील रामकुंडानजीक असलेल्या उंच टेकडीवर पूर्वी एक गुहा होती.सुमारे ११०० च्या सुमारास गुहेतील शिवलिंगासभोवती कुणा गवळी राजाने छोटे मंदिर बांधून दिल्याचे उल्लेख काही ठिकाणी आहेत. तर त्यानंतर पेशवेकाळात १७३८ साली तत्कालीन पाच हजार रुपये खर्च करून मंदिराचा बांधकाम केल्याचे उल्लेख आहेत तर १७६३ साली मंदिराचा पुढील भाग बांधले गेल्याचे उल्लेख आहेत. ज्या मंदिराच्या बाहेर नंदी तिष्ठत उभा नाही, असे भारतातील हे एकमेव शिवमंदिर असल्याचे बोलले जाते. नंदीने साक्षात भगवान शिवशंकराला मुक्तीचा मार्ग या ठिकाणी दाखविल्याने या मंदिराबाहेर नंदी नसल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सर्व श्रावणी सोमवार तसेच हरीहर भेट, वैकुंठ चतुर्दशीला मंदिराला विशेष सजविण्यात येते तसेच सोमवारी, महाशिवरात्रीला कपालेश्वराचा चांदीचा मुकुट पालखीतून रामकुंडावर आणून वाजत-गाजत मिरवत नेऊन तो शिवलिंगावर ठेवून शाेडषोपार पूजन केले जाते.

फोटो

१९ कपालेश्वर

Web Title: The glory of Nashik