शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वैभवशाली कॉँग्रेसला लागले ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 01:00 IST

१९७२ च्या निवडणुकीत जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या कॉँग्रेसला मात्र नंतरच्या पंचवार्षिक म्हणजेच १९७७ मध्ये सपाटून मार खावा लागला. त्याचा परिणाम नाशिक या पारंपरिक कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर झाला. नाशिक विधानसभा मतदारसंघावर तोपर्यंत अपवाद वगळता कॉँग्रेसचा झेंडा घट्ट रोवला गेला होता.

नाशिक : १९७२ च्या निवडणुकीत जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या कॉँग्रेसला मात्र नंतरच्या पंचवार्षिक म्हणजेच १९७७ मध्ये सपाटून मार खावा लागला. त्याचा परिणाम नाशिक या पारंपरिक कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर झाला. नाशिक विधानसभा मतदारसंघावर तोपर्यंत अपवाद वगळता कॉँग्रेसचा झेंडा घट्ट रोवला गेला होता.नाशिक जिल्ह्यातील १४ जागांपैकी कॉँग्रेसला बागलाण, इगतपुरी, दिंडोरी आणि दाभाडी या अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी कॉँग्रेसची फूट हेदेखील पराभवाचे आणखी एक कारण होते. १९८० मध्ये राज्याला मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले. १९७८ च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या तिकिटावर पहिल्याच प्रयत्नात निवडून आलेले वसंत उपाध्ये यांना कॉँग्रेसच्या लाटेत पराभव पत्करावा लागला. तिरंगी झालेल्या या निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव झाला, मात्र बंडखोर अपक्ष (स्व.) शांतारामबापू वावरे हे निवडून आले. १९८५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुलोदची (पुरोगामी लोकशाही दल) मोट बांधली. त्यावेळी नाशिक जिल्ह्याने १४ आमदार पुलोदचे निवडून दिले. १९९० च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे पंडितराव खैरे यांचा पराभव झाला. १९९५ च्या निवडणुकीत जिल्ह्यात कॉँग्रेसला जेमतेम जागांवर समाधान मानावे लागले; मात्र पारंपरिक दाभाडी, दिंडोरी, कळवण, येवला आदी मतदारसंघांवर कॉँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले.२०१४ मध्ये दोन जागांवर समाधान२००४ मध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. दोन्ही कॉँग्रेसने या निवडणुकीत समजूतदारपणाची भूमिका घेऊन युती केली असली तरी, राष्टÑवादीची जिल्ह्यात फारशी मदत कॉँग्रेसला होऊ शकली नाही. त्यामुळे कॉँंग्रेसला दोन जागांवरच समाधान मानावे लागले. एकेकाळी जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या कॉँग्रेसचे वैभव हळूहळू लयास गेले. मुस्लीम बहुसंख्य असलेल्या मालेगाव मतदारसंघात कॉँग्रेसने आलटून पालटून आपले वर्चस्व कायम ठेवले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने इगतपुरी मतदारसंघावर पहिल्यांदाच झेंडा रोवला. या निवडणुकीत कॉँग्रेसला दोनच जागा मिळाल्या, २०१४ च्या निवडणुकीतही यापेक्षा काही वेगळे घडले नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस