लाडशाखीय वाणी समाजातर्फे गुणगौरव
By Admin | Updated: September 29, 2016 01:47 IST2016-09-29T01:47:33+5:302016-09-29T01:47:55+5:30
लाडशाखीय वाणी समाजातर्फे गुणगौरव

लाडशाखीय वाणी समाजातर्फे गुणगौरव
कळवण : येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात समाजातील गुणवंतांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला. कळवणचे समाजाध्यक्ष संजय मालपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उन्नती शिक्षण संस्थेचे सरचिटणीस अॅड. प्रवीण अमृतकार व निफाडच्या शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोडे आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आठवडाभर विद्यार्थ्यांसाठी महिला व पुरुषांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजय मिळवलेल्या स्पर्धेकांचा व शैक्षणिक गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कळवणच्या लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्र मात कमकोचे अध्यक्ष किशोर वेढणे, जनसंपर्क संचालक राजेंद्र अमृतकार, महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष शैलजा सुरेश कोठावदे, उपाध्यक्ष उषा रमेश कोठावदे, जनसंपर्क संचालक शकुंतला सोनजे, रोटरीच्या सहप्रांतपाल विलास शिरोरे आदि मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी अॅड. प्रवीण अमृतकर, डॉ. नेहा शिरोडे, संजय मालपुरे यांची भाषणे झाली.
गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या श्री धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तिपर गीत गायले. कार्यक्र मात रंगत आणली.
उपाध्यक्ष सतीश कोठावदे, सेक्र ेटरी नीलेश महाजन आदिंसह संचालक मंडळाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. तसेच विविध स्पर्धांमध्ये व शैक्षणिक गुणवत्तेत यशस्वी ठरलेल्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अजय अमृतकर व सुधाकर शिरोरे यांनी, तर प्रास्ताविक डॉ. के. के. कोठावदे यांनी केले. आभार दर्शना मालपुरे हिने मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी डॉ. पी. एच. कोठावदे, राजेंद्र मालपुरे, दत्तात्रेय अमृतकर,संजय महाजन, नंदिकशोर दशपुते, लक्ष्मण खैरनार,रु पेश शिरोडे, आदी संचालक मंडळ, व्यवस्थापक वनजी ततार यांच्यासह किशोर कोठावदे, पवन कोठावदे, सचिन मालपुरे, अमृतकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्र मास कळवणमधील संपूर्ण समाजबांधव परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)