शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

जखमी सांबराला मिळाले जीवदान

By admin | Updated: March 20, 2015 00:06 IST

लवटे यांची माणुसकी : वणी-ओझरखेड दरम्यान सापडले सांबर

नाशिकरोड : वणी-ओझरखेड दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेने बुधवारी मध्यरात्री जखमी होऊन विव्हळत पडलेल्या एका सांबरास अनुराधा फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष राजू लवटे यांनी आपल्या वाहनातून नाशिकला पहाटे वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्वरित उपचार मिळाल्याने त्या सांबराला जीवदान मिळाले आहे.नाशिकरोड येथील अनुराधा फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष राजू लवटे हे आपला गाडीचालक संतोष निरभवणे याच्यासह बुधवारी रात्री साडेअकरा सुमारास सापुताऱ्यावरून नाशिकला येत होते. वणी-ओझरखेड दरम्यान वनविभागाचे मोठे क्षेत्र असून, जंगल आहे. लवटे येत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला अंधारात एक प्राणी जखमी अवस्थेत तडफडत असल्याचे दिसले. लवटे यांनी गाडी पुन्हा माघारी फिरविली असता त्यांना एक सांबर अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेले दिसून आले. त्याच्या पायाला गंभीर इजा झालेली होती. लवटे यांनी तत्काळ त्या जखमी सांबराला आपल्या गाडीत व्यवस्थित ठेवले. लवटे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फोन करून माहिती देत वन विभागाचा नंबर मागितला. मात्र दिंडोरी पोलिसांकडे नंबर नसल्याने लवटे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फोन करून नाशिकच्या कार्यालयाचा फोन नंबर मिळविला. पहाटे ३ वाजेच्या सुमारास लवटे यांनी त्या जखमी सांबरास वनविभागाचे लिंबेकर यांच्या ताब्यात दिले. येत्या रविवारी पुणे येथील डॉक्टर आल्यावर त्या जखमी सांबराच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. (प्रतिनिधी)