शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

आदिवासींच्या कौशल्याला वाव द्यावा : सूरज मांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:03 AM

आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे.

नाशिक : आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केली.पूर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेचा जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मांढरे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, शिवाजी फुले, तुषार चव्हाण उपस्थित होते. यावेळी मांढरे म्हणाले, बांबूच्या वस्तू विक्र ीसाठी वनविभागाने चांगले व्यासपीठ आदिवासींना उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी वनमंत्रालयाच्या बांबू विकास मंडळाचे सहकार्य घ्यावे.नाशिक पश्चिम विभागातील ननाशी वनपरिक्षेत्रातील गवळीपाडा (महाजे) येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. मान्यवरांच्या हस्ते समितीच्या पदाधिकाऱ्यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे, ननाशी परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, त्र्यंबकेश्वरचे कैलास अहिरे यांसह तीनही गावांचे समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पूर्व विभागातील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील गोंदूने आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट पाड्याने वनसंवर्धनात अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. प्रास्ताविक फुले यांनी केले. सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांनी केले.राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करावनसंवर्धनामध्ये आघाडी घेत गवळीपाड्याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच गोंदूने, श्रीघाट या गावांनी आपले स्थान राखले. गवळीपाडा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, या पाड्यावरील नागरिकांनी एकदिलाने वनविकास व संवर्धनासाठी अधिकाधिक प्रयत्न करावे जेणेकरून राज्यस्तरावरही प्रथम क्रमांक पटकाविता येईल. असे आवाहन यावेळी शिवाजी फुले यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीforest departmentवनविभाग