तिकिटे योग्य उमेदवारांना द्या, इच्छुकांच्या मागणीने खळबळ

By Admin | Updated: August 13, 2014 00:43 IST2014-08-13T00:13:20+5:302014-08-13T00:43:36+5:30

राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस बैठक

Give the tickets to the right candidates, the excitement on the demand of the interested | तिकिटे योग्य उमेदवारांना द्या, इच्छुकांच्या मागणीने खळबळ

तिकिटे योग्य उमेदवारांना द्या, इच्छुकांच्या मागणीने खळबळ

नाशिक : आम्ही खूप कामे केली आहेत, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्याचे काम केले असून, लोकसभेत मोदी लाटेमुळे पराभव झाला. आता मात्र योग्य उमेदवारांना तिकिटे दिल्यास पक्षाला निश्चितपणे यश मिळेल, अशी मागणी करीत अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीसाठी मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या बैठकीत खळबळ उडाली.
राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसची शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण व निरीक्षक उषाताई दराडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात मंगळवारी दुपारी झाली. या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच महिला पदाधिकारी व महिला लोकप्रतिनिधींना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रसार व प्रचार कसा करावा, याचे मार्गदर्शन बैठकीत करण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी महिला पदाधिकारी इच्छुक आहेत काय, विधानसभेसाठी काय तयारी केली पाहिजे, याचीही मते जाणून घेण्यात आली. त्यात पक्षाच्या एका विद्यमान आमदाराच्या मतदारसंघातील महिला लोकप्रतिधिनीने आपल्या मनोगतात सांगितले की, आपण कार्यरत असलेल्या पदावरून अनेक लोकहिताची कामे केली. माध्यमांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली तरी आम्ही काम करीत राहिलो. आताही योग्य उमेदवारांना तिकिटे दिल्यास पक्षाला निश्चितपणे यश मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख नेमका कोणावर होता, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती, तर दुसऱ्या एका महिला पदाधिकाऱ्याने आमचा मतदारसंघ कॉँग्रेसला सुटला असला तरी आम्ही मित्रपक्ष असल्याने आघाडीचा धर्म पाळू आणि त्यांना जास्तीत जास्त मते मिळवून देऊ, असे सांंगितले. शहरातील एका महिला पदाधिकाऱ्याने आपल्याला अनेक पदे मिळाली, मात्र अजूनही नेमके काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन मिळाले तर आणखी चांगले काम करता येईल, अशी भावना व्यक्त केली. बैठकीनंतर प्रत्यक्षात किती महिला उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयारी दाखविली व किती महिला उमेदवारांना पक्ष तिकीट देणार याची निश्चित माहिती प्रदेश नेत्यांना देता आली नाही. बैठकीस यावेळी रेखाताई फष्टे, शुभांगी जगताप, शोभा मगर, जि. प. अध्यक्ष जयश्री पवार, जि. प. सभापती अलका जाधव, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार, संगीता ढगे, सुजाता वाजे, कविता कर्डक, माजी जि. प. अध्यक्ष मायावती पगारे, मंगला कदम, अलका साळुंखे, भारती साळवे, कल्पना चुंबळे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Give the tickets to the right candidates, the excitement on the demand of the interested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.