जिल्हा बँक वाचविण्यासाठी ७३२ कोटी रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:08+5:302021-09-21T04:17:08+5:30

किसान सभेच्यावतीने गेल्या शुक्रवारी वीज कर्मचारी पतसंस्था, हॉल जानकी प्लाझा खरबंदा पार्क द्वारका येथे सहकार परिषेद ...

Give Rs 732 crore to save the district bank | जिल्हा बँक वाचविण्यासाठी ७३२ कोटी रुपये द्या

जिल्हा बँक वाचविण्यासाठी ७३२ कोटी रुपये द्या

किसान सभेच्यावतीने गेल्या शुक्रवारी वीज कर्मचारी पतसंस्था, हॉल जानकी प्लाझा खरबंदा पार्क द्वारका येथे सहकार परिषेद आयोजित करण्यात आली होती. कॉ. राजू देसले अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी राजाराम गायधनी, विष्णुपंत गायखे, संपत जाधव, शिवराम गायधनी, नामदेव बोराडे, किरण डावखर, भास्करराव शिंदे, सतीश कोठावळे, चंद्रभान कोंबडे, संदीप नगरकर, ज्ञानेश्वर तुपसुंदर, संपत थेटे, रामचंद्र टिळे, विठोबा धोत्रे, श्रीकृष्ण शिरोडे, के.एन. अहिरे, राजकुमार चव्हाण, सुनील मजुलकर, त्रंबक पारधी बाजीराव धुळे, निवृत्ती कसबे, जयश्री आहेर, भास्कर लांडगे, भीमा पाटील, महादेव खुडे, विराज देवांग, अड दत्ता निकम, विठ्ठल घुले, सोपान थोरात आदी उपस्थित होते.

परिषदेत जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीबाबात चर्चा झाली. गेली ५ वर्ष कर्जवसुली होऊ न शकल्यामुळे जिल्हा बँकेचा एनपीए वाढला आहे. सदर बँक ही जिल्ह्यातील सहकार चळवळीचा कणा आहे. ही बँक वाचणे गरजेची आहे. रिजर्व बँक च्या नियमाप्रमाणे जिल्हा बँकेला १५ टक्के ग्रॉव एनपीए व नेट एनपीए प्रमाण पाच टक्के लागते. त्यामुळे आता जिल्हा बँक चा बँक परवाना रद्द होऊ शकतो. निलंबित होऊ शकतो. आरबीआयने परवाना रद्द केल्यास ठेवी स्वीकारता येणार नाही. बँकेत असलेल्या २,१५० कोटी रुपये ठेवी दार अडचणीत येणार आहेत. आरपीआयची कारवाई थांबण्यासाठी आता त्वरित ७३२ कोटी रुपये बँकेत येणे आवश्यक आहे. मात्र शेतकरी कोरोना मुळे व पिकाला भाव नसल्यामुळे कर्ज भरत नाही. महाराष्ट्र शासनाने केलेली कर्जे माफी ची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे बँक अडचणीत आली आहे.

महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या काही जिल्हा बँक ना राज्य शासनाने मदत केली आहे. त्या प्रमाणे नाशिक जिल्ह्या बँकेला मदत करावी. असा ठराव कॉ. राजू देसले यांनी परिषदेत मांडला त्याला. विष्णुपंत गायखे यांनी अनुमोदन दिले याप्रसंगी

कॉम्रेड नामदेव गावडे, विश्वास ठाकूर, विष्णुपंत गायखे, संदीप नगरकर, विश्वनाथ निकम, आदींची भाषणे झाली. यावेळी नामदेव गावडे लिखित ‘शेती विकासाच्या पर्यायी वाटा’ पुस्तक प्रकाशन नारायण शेट वाजे व मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असलेल्या अमृता वसंत पवार यांना ‘सहकार रत्न सन्मान’ देण्यात आला.

चर्चेत व्ही. डी. धनवटे, संपत वक्ते, प्रा. के. एन. अहिरे, प्रा. अशोक सोनवणे, पुंडलोक थेटे आदी सहभागी झाले होते. सहकार चळवळ आजची परिषद व भावी लढा पुस्तिका प्रा. अशोक सोनवणे लिहिण्याची जबाबदारी घेतली आहे. सूत्रसंचालन ॲड. दत्तात्रय गांगुर्डे यांनी केले. आभार भास्कर शिंदे यांनी मानले. याप्रसंगी स्वागत नामदेव बोराडे, किरण डावखर यांनी केले. (फोटो २० शेती)

Web Title: Give Rs 732 crore to save the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.