भावी पिढीला योग्य दिशा द्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:19 IST2020-02-17T23:11:10+5:302020-02-18T00:19:48+5:30

आजचा युवक हा उद्याच्या प्रगतिशील भारताचा शिल्पकार असून, या युवकांनाच भरकटवण्याचे काम केले जात आहे. यामधून भावी पिढी दिशाहीन होणार असल्याने शिक्षक व पालकांनी सजग राहून दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन कवी प्रशांत मोरे यांनी केले.

Give the right direction to future generations! | भावी पिढीला योग्य दिशा द्यावी!

मनमाड येथे विद्यार्थी-पालक-शिक्षक साहित्य संमेलनात बोलताना कवी प्रशांत मोरे. समवेत डॉ.बी.एस. जगदाळे, प्रदीप गायकवाड आदी.

ठळक मुद्देप्रशांत मोरे : विद्यार्थी पालक-शिक्षक साहित्य संमेलन

मनमाड : आजचा युवक हा उद्याच्या प्रगतिशील भारताचा शिल्पकार असून, या युवकांनाच भरकटवण्याचे काम केले जात आहे. यामधून भावी पिढी दिशाहीन होणार असल्याने शिक्षक व पालकांनी सजग राहून दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन कवी प्रशांत मोरे यांनी केले.
अध्यापक भारती, परिवर्तन सोशल अकादमी व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी-पालक-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एस. जगदाळे, आॅल इंडिया एससी-एसटी असोसिएशन अध्यक्ष प्रदीप गायकवाड, झोनल सचिव सतीश केदारे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बब्बू शेख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष परिवर्तन अकादमीचे अध्यक्ष आमिन शेख यांनी स्वागत केले. आजचे साहित्य व माध्यमे, विद्यार्थी-पालक-शिक्षकांचे ज्वलंत शैक्षणिक प्रश्न मांडत आहेत का? या विषयावरील परिसंवादात अशोक बनकर, रोहित गांगुर्डे, प्रा. राजेंद्र दिघे, स्वाती त्रिभुवन यांनी सहभाग घेतला. कविसंमेलनात विष्णू थोरे, रवींद्र मालुंजकर, प्रशांत केंदळे, जनार्दन देवरे, लक्ष्मण महाडिक, राज शेळके, राजेंद्र उगले, अरुण इंगळे, प्रदीप गुजराथी, रविराज सोनार, प्रा. सुरेश नारायणे, दयाराम गिलाणकर आदी कवी सहभागी झाले होते.

Web Title: Give the right direction to future generations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.