भगूर उड्डाणपुलास छत्रपतींचे नाव द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:35 IST2019-06-18T00:35:21+5:302019-06-18T00:35:51+5:30
येथील रेल्वेफाटक गेटवरील नवीन उड्डाणपुलास राजा छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे, अशी मागणी भगूर शहर समस्त देशमुख आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.

भगूर उड्डाणपुलास छत्रपतींचे नाव द्यावे
भगूर : येथील रेल्वेफाटक गेटवरील नवीन उड्डाणपुलास राजा छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे, अशी मागणी भगूर शहर समस्त देशमुख आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भगूर शहरातील रेल्वेफाटक गेटवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भव्य नवीन उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याने सदरच्या उड्डाणपुलास छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे, अशी मागणी भगूर समस्त देशमुख समाज प्रमुख रवींद्र देशमुख, काकासाहेब देशमुख, भानुदास देशमुख, नंदू देशमुख, संभाजी देशमुख आदींनी केली आहे. या उड्डाणपुलास छत्रपतींचे नाव देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यासह शिष्टमंडळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.