पर्यटन विकासासाठी अधिक निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:05 IST2017-09-10T00:02:07+5:302017-09-10T00:05:50+5:30
लोणजाईमाता मंदिर परिसर निसर्गसंपन्न असून, लोणजाई गड पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन व रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पर्यटन विकासासाठी अधिक निधी देणार
विंचूर : लोणजाईमाता मंदिर परिसर निसर्गसंपन्न असून, लोणजाई गड पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, असे आश्वासन पर्यटन व रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनी
दिले.
येथून जवळच असलेल्या सुभाषनगर परिसरातील लोणजाई माता मंदिर परिसर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी रावल यांनी शुक्रवारी मंदिर व परिसराची पाहणी केली. रावल यांच्यासमवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, निफाड पंचायत समितीचे सभापती पंडितराव आहेर, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, बापूसाहेब पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप, नानासाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे आदि उपस्थित होते. निफाड तालुक्याचे आराध्यदैवत असलेल्या लोणजाई माता गडावर शेकडो भाविक येत असतात. तसेच लोणजाईमाता परिसर निसर्ग संपन्न असल्याने पर्यटकांची कायम वर्दळ असते. श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच पंचायत समितीच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याचीदेखील रावल यांनी पाहणी करून भविष्यात येथे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात येईल, असे आश्वासन देत उपस्थितांकडून लोणजाईमातेच्या मंदिराबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
यावेळी बापुसाहेब पाटील, वैकुंठराव पाटील, संजय वाबळे, नीलेश सालकाडे, नरेंद्र परदेशी, पं. स. सदस्य शिवा सुराशे, प्रांताधिकारी, गटशिक्षणाधिकारी रसाळ, नायब तहसीलदार संघिमत्रा, सरपंच ताराबाई क्षीरसागर, उपसरपंच आत्माराम दरेकर, काका दरेकर, सुभाषनगर सरपंच भिवाजी सोदक, उपसरपंच सोपान म्हाळशिकारे, मधुकर बाबूराव दरेकर, माणिक शास्त्री महाराज उपस्थित होते.