स्वातंत्र्यसैनिकांना समान पेन्शन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:02 IST2017-08-10T01:02:16+5:302017-08-10T01:02:37+5:30

उपोषण : क्रांती दिनानिमित्त जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांना एकसमान पेन्शन द्या, बेघरांना घरकुल द्या, हिंदमाता स्वातंत्र्यसैनिक सोसायटीच्या ताब्यात शासनाने जागा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. ९) लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.

Give equal pay to freedom fighters | स्वातंत्र्यसैनिकांना समान पेन्शन द्या

स्वातंत्र्यसैनिकांना समान पेन्शन द्या

नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांना एकसमान पेन्शन द्या, बेघरांना घरकुल द्या, हिंदमाता स्वातंत्र्यसैनिक सोसायटीच्या ताब्यात शासनाने जागा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. ९) लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. क्रांती दिनानिमित्त नाशिक शहर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक समितीच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकामध्ये सकाळी ध्वजारोहण करत स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाºया शहिदांना अभिवादन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष पंडित येलमामे, सरचिटणीस वसंत हुदलीकर यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडक र यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. स्वातंत्र्यसैनिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली. यावेळी दगडूसा कलाल, मनोहर कुलकर्णी, सरस्वतीबाई मोरे, विमलबाई आटवणे, सरस्वतीबाई पाटील, सत्यभामा मोजाड, जिजाबाई शिंदे, लक्ष्मीबाई गायकवाड आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्या२००५ साली हिंदमाता स्वातंत्र्यसैनिक गृहनिर्माण सोसायटीसाठी जागा वाटप प्रस्ताव मंजूर करूनही सदर जागा शासनाने अद्याप सैनिकांना ताब्यात दिलेली नाही, ती तत्काळ द्यावी. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकºयांमध्ये १० टक्के आरक्षण द्यावे. भूमिहीन स्वातंत्र्यसैनिकांना जमीन द्यावी. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना सैन्य व पोलीस भरतीमध्ये प्राधान्यक्रम द्यावा.

Web Title: Give equal pay to freedom fighters