गीतांजली एक्स्प्रेसचा अपघात टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:06 IST2018-01-10T00:05:39+5:302018-01-10T00:06:48+5:30
मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना होत असताना रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब वेळीच निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला आहे.

गीतांजली एक्स्प्रेसचा अपघात टळला
मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना होत असताना रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब वेळीच निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला आहे.
गाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसला मनमाड रेल्वेस्थानकावर थांबा नाही. गाडी नाशिकहून निघाल्यानंतर थेट भुसावळला थांबते. गाडी मनमाड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक २ वरून वेगात रवाना होत असताना स्टेशन मास्तर कार्यालयासमोर मोठा आवाज झाला. त्यामुळे फलाटावरील प्रवाशांमधे संभ्रम निर्माण झाला. फलाटावरील विक्रेत्यांनी ही माहिती स्टेशन मास्तर कार्यालयात दिल्यानंतर युद्धपातळीवर रुळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन अर्ध्या तासात दुरुस्ती करण्यात आली.