शिक्षणाच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:57 IST2018-04-05T00:57:37+5:302018-04-05T00:57:37+5:30

एसवायबीएचे शिक्षण घेत असता एफवायबीएच्या राहिलेल्या विषयांचे पेपर अवघड गेल्याने सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ मयूरी राधाकृष्ण सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्रीशा रेसिडेन्सी, कालिका पार्कजवळ, सिडको) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 The girl's suicide due to the depression of education | शिक्षणाच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

शिक्षणाच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

सिडको : एसवायबीएचे शिक्षण घेत असता एफवायबीएच्या राहिलेल्या विषयांचे पेपर अवघड गेल्याने सिडकोतील अठरा वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ मयूरी राधाकृष्ण सोनवणे (फ्लॅट नंबर १०, रा. श्रीशा रेसिडेन्सी, कालिका पार्कजवळ, सिडको) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.  अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिंद्र आणि महिंद्र कंपनीतील अधिकारी राधाकृष्ण भोलानाथ सोनवणे हे सिडकोतील श्रीशा पार्कमध्ये राहतात़ त्यांची मुलगी मयूरी ही सिडको महाविद्यालयात एसवायबीएचे शिक्षण घेत होती़ मात्र, तिचे एफवायबीएचे काही विषय राहिले होते व तिने नुकतीच परीक्षाही दिली होती़ मात्र, दिलेले पेपर पुन्हा अवघड गेल्याने ती नैराश्यात होती़  मंगळवारी सायंकाळी मयूरीचे आई-वडील हे कामानिमित्त बाहेर गेले तर भाऊही कामावर गेला होता़ या कालावधीत नैराश्यग्रस्त मयूरीने घरातील बेडरूममधील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़  दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू  आहे.

Web Title:  The girl's suicide due to the depression of education