चाकूचा धाक दाखवून मुलीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:06 IST2019-04-11T23:04:17+5:302019-04-11T23:06:20+5:30

नाशिक : कॉलेजरोडवरून भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास घराकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने रिक्षामध्ये ओढून घेत चाकूचा धाक दाखवून ‘तू माझ्याशी मैत्री ठेव, लग्न कर’ असे सांगत पीडित मुलीला मारहाण करून रिक्षामध्ये तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदार मित्रालाही अटक केली आहे.

Girl's molestation by knife | चाकूचा धाक दाखवून मुलीचा विनयभंग

चाकूचा धाक दाखवून मुलीचा विनयभंग

ठळक मुद्देरिक्षाचालकासह एकास अटक

नाशिक : कॉलेजरोडवरून भरदुपारी दोन वाजेच्या सुमारास घराकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने रिक्षामध्ये ओढून घेत चाकूचा धाक दाखवून ‘तू माझ्याशी मैत्री ठेव, लग्न कर’ असे सांगत पीडित मुलीला मारहाण करून रिक्षामध्ये तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या साथीदार मित्रालाही अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दुपारच्या सुमारास कॉलेजरोडवरून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची वाट अडवून संशयित आरोपी रिक्षाचालक नितीन पांडुरंग साबळे (२०, रा. फुलेनगर) याने रिक्षा रोखली त्यावेळी त्याचा मित्र संशयित अनिकेत बापू पाटील (१८, रा. पंचवटी) हा रिक्षामध्ये पाठीमागे बसलेला होता. त्याने पीडित मुलीचा हात धरून बळजबरीने रिक्षामध्ये ओढले.
पीडितेला चाकूचा धाक दाखवत रिक्षामध्ये डांबून ठेवले. यावेळी साबळे रिक्षा पुढे घेऊन जात होता. दरम्यान, पाटील याने पीडितेसोबत अश्लील कृत्य करीत तिच्या गालात चापटीने मारहाण केली, अशी फिर्याद पीडित मुलीने गंगापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Girl's molestation by knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.