भेटवस्तूंनी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 17:09 IST2018-02-07T17:06:04+5:302018-02-07T17:09:45+5:30
व्हॅलेंटाइन डेचे वेध

भेटवस्तूंनी सजली बाजारपेठ
नाशिक : ‘व्हॅलेंटाइन डे’ अर्थात प्रेमाच्या उत्सवासाठी गुलाबाची फुले, आकर्षक स्वादातले चॉकलेट, कॅडबरीसह गोड पदार्थ, ग्रिटिंग्ज, भेटवस्तू यांची दुकानात मोठी रेलचेल पहायला मिळत आहे. पारंपरिकतेने व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनला अनुकूल असे वातावरण असून. प्रेमिजनांना मनसोक्तपणे हा दिवस साजरा करता येणार असल्याचे चित्र आहे. प्रेमदिनासाठी शहरातील बाजारपेठा विविध भेटवस्तूंनी फुलल्या आहेत. गिप्टच्या दुकानांमध्ये कॉफी मग, सॉफ्ट टॉइज, कपल किचेन, क्रिस्टल रोज, चॉकलेट बॉक्स, फोटोफ्रेम, परफ्युम, पिलोज, टी-शर्ट यांचे असंख्य भारतीय बनावटीचे पर्याय पहायला मिळत आहे. १०० ते २००० रुपयांपर्यंत या वस्तू मिळत असून, आपल्या प्रिय व्यक्तीची आवड, गरज लक्षात घेऊन त्याचे नियोजन केले जात आहे. चॉकलेट्सचे नवीन प्रकार, टेडी बिअर, विविध आकर्षक भेटवस्तू दुकानांमध्ये सजल्या आहेत. सोशल मीडियामुळे शुभेच्छापत्रांना मागणी कमी झाली असली तरीदेखील काही प्रमाणात त्यांची खरेदी पहायला मिळते आहे.