मालसाणेत संताची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 18:57 IST2020-01-10T18:57:09+5:302020-01-10T18:57:31+5:30
चांदवड येथे जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या संतानी मालसाणे येथील नमोकारतिर्थ येथे सारस्वताचार्य देवनंदीमहाराज या दोन्ही राष्टÑसंताची भेट झाली.

चांदवड जवळील मालसाणे येथील नमोकारतिर्थ येथे जैनाचार्य विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज व सारस्वताचार्य देवनंदीजी महाराज या दोन्ही राष्टÑसंताचे महामिलन प्रसंगी जैन साधुसंत.
चांदवड : चांदवड येथे जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या संतानी मालसाणे येथील नमोकारतिर्थ येथे सारस्वताचार्य देवनंदीमहाराज या दोन्ही राष्टÑसंताची भेट झाली.
यावेळी नमोकार तिर्थ येथे नूतन ध्यानमंदिराचे अनावरण जैनाचार्य विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही राष्टÑसंताचे व्याख्यान झाले . दिगंबरआचर्य , मुर्तीपुजक जैनाचार्य यांची भेट झाली. भविष्यात या नमोकार तिर्थ येथे एकत्रीत चार्तुमास व्हावा अशी भावना दोन्ही संतानी यावेळी व्यक्त केली.
यावेळी दोन्ही संतानी एकमेकांना धार्मिक पुस्तके भेट दिली. यानंतर जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचे खडकजाब, वडाळीभोई येथे
स्वागत केले . सूत्रसंचालन औरगांबादचे महावीर पटणी यांनी केले. यावेळी औरगांबाद, वडाळीभोई, चांदवड, पिंपळगाव, नाशिक, उमराणा, मालेगाव येथील भक्त उपस्थित होते.