शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

क्रिकेट स्पर्धेत घोटी वॉरियर्स संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 7:23 PM

घोटी : येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पुढाकारातून घोटी प्रीमिअर लीग सिझन १ क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.६) चार संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व रोख बक्षिसाचे वितरण करून समारोप करण्यात आला. या सामन्यात एकूण आठ संघांनी भाग घेतला होता.

ठळक मुद्देघोटी सोल्जर संघ उपविजेता : गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने स्पर्धा उत्साहात

घोटी : येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पुढाकारातून घोटी प्रीमिअर लीग सिझन १ क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.६) चार संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व रोख बक्षिसाचे वितरण करून समारोप करण्यात आला. या सामन्यात एकूण आठ संघांनी भाग घेतला होता.या सामन्यात प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस घोटी वॉरियर्स संघाने पटकावले. या संघाचे तुषार नवगिरे व दशरथ भटाटे यांना संदीप किर्वे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घोटी सोल्जर संघाने पटकावले. कर्णधार नीलेश काळे, गुरुनाथ दुभाषे यांना ३१ हजार रुपये व ट्रॉफी घोटीचे सरपंच सचिन गोणके व उपसरपंच रामदास भोर यांच्या हस्ते देण्यात आले.तृतीय क्रमांकाचे बक्षीस घोटी किंग एलेव्हन संघास मिळाले. संघाचे अंबादास दुभाषे, शांताराम लंगडे यांना २१ हजार रुपये व ट्रॉफी माजी सरपंच संजय आरोटे यांच्या हस्ते देण्यात आले. तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस घोटी इंडियन या संघाने पटकावले. या संघाचे योगेश भटाटे, गणेश काळे यांना सरपंच सत्यम काळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सहा दिवस चाललेल्या या क्रिकेटचे थेट प्रक्षेपण लाइव्ह करण्यात आले होते.या दरम्यान संदीप किर्वे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, नयना गावित, उदय जाधव, गोरख बोडके, निवृत्ती जाधव, विठ्ठल लंगडे, सचिन गोणके, रामदास भोर, कुलदीप चौधरी, रवींद्र गोठी, अण्णासाहेब पवार, विक्रम मुनोत, समाधान जाधव, निलेश आंबेकर, मनोज चोपडा, गणेश काळे, बाळा गव्हाणे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी नीलेश काळे, नीलेश आंबेकर, विशाल शिंदे, दशरथ भटाटे, रमेश बोऱ्हाडे, माधव तोकडे आदींनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीigatpuri-acइगतपुरी