संविधान दिनानिमित्त घोटीत रॅली

By Admin | Updated: November 26, 2015 21:54 IST2015-11-26T21:53:30+5:302015-11-26T21:54:06+5:30

संविधान दिनानिमित्त घोटीत रॅली

Ghatiya Rally on the occasion of Constitution Day | संविधान दिनानिमित्त घोटीत रॅली

संविधान दिनानिमित्त घोटीत रॅली

घोटी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना समिर्पत केल्याच्या दिनाच्या निमित्ताने आज 66 व्या संविधान दिनानिमित्त आज घोटी शहरातील आंबेडकरी जनतेच्या वतीने आज प्रबोधनात्मक रॅली काढण्यात आली.या रॅलीत युवकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
व्या संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेची सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी यासाठी प्रबोधन करण्यासाठी आज घोटी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरमधून रॅली काढण्यात आली.या रॅलीचा समारोप घोटी पोलीस ठाण्यात झाला.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे,उपनिरीक्षक गणेश शेळके ,कमलेश बच्छाव आदिनी राज्यघटनेबाबत माहिती विषद केली.
या रॅलीत ग्रा.प.सदस्य मदन रु पवते,मारु ती रु पवते,अमोल क?ळे, राहुल शिंदे,विलास रु पवते,किशोर रु पवते,आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

Web Title: Ghatiya Rally on the occasion of Constitution Day