शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घोटी : दारणा धरणाचे पाणी सोडण्यास विरोध

By admin | Updated: October 23, 2015 00:09 IST

शिवसेनेचा रास्ता रोको

घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून मराठवाड्यासाठी पाण्याचे आवर्तन करू नये, या मागणीसाठी गुरुवारी इगतपुरी तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याबाबत आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र पवार यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार हेमंत गोडसे यांनी केले.याबाबत वृत्त असे की, मराठवाड्याला नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्यात येणार आहे. यातील इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून सुमारे ३२४० दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. या धरणावर तालुक्याची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची भिस्त अवलंबून असल्याने या धरणातून पाणी सोडल्यास आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने या धरणातून पाणी सोडण्यास संपूर्ण तालुक्यातून विरोध होत आहे.दरम्यान, शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतलेला पाणी सोडण्याचा निर्णय तालुक्यातील जनतेवर अन्यायकारक असल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा व दारणा धरणातून पाणी सोडू नये, या मागणीसाठी आज इगतपुरी तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात खासदार हेमंत गोडसे यांच्यासह तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुकाप्रमुख समाधान वारुंगसे, समाधान बोडके, अशोक सुरुडे, कुलदीप चौधरी, राजेंद्र नाठे, सूर्यकांत भागडे, संजय आरोटे, मोहन बऱ्हे, कावजी ठाकरे, केरू देवकर, रमेश धांडे, माजी आमदार शिवराम झोले, नंदलाल भागडे, पांडुरंग गांगड, विनोद भागडे आदिंसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)