त्र्यंबकेश्वर पंचायत समिती स्थलांतरणाचा घातला घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:49+5:302021-07-22T04:10:49+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील पंचायत समिती कार्यालयाचे तालुक्याच्या मुख्यालयाऐवजी शहरापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत स्थलांतर ...

त्र्यंबकेश्वर पंचायत समिती स्थलांतरणाचा घातला घाट
त्र्यंबकेश्वर : येथील पंचायत समिती कार्यालयाचे तालुक्याच्या मुख्यालयाऐवजी शहरापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत स्थलांतर करण्याचा घाट घातला जात आहे. सदर ठिकाणी इमारत बांधकामाचा प्रस्ताव असल्याचे समजते.
पंचायत समितीच्या इमारतीसाठी आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले असून तहसीलदार दीपक गिरासे यांनी त्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले जाते. परंतु जागामालक असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग त्याला राजी होईल काय, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांचे दोन उपविभागीय कार्यालये आहेत. नवीन जागेत स्थलांतर झाल्यास तालुक्यात त्र्यंबकेश्वर शहरासह १२५ गावे आहेत. इगतपुरी तालुक्यातील २० गावे व नाशिक तालुक्यातील ४६ गावांपैकी खंबाळे, वाढोली, अंजनेरी, पेगलवाडी, तळवाडे पिंप्री या गावांना पेगलवाडी फाटा सोयीचा होईल. पण पेठ तालुक्यातील ५८ गावांची गैरसोय हाेणार आहे. त्यामुळे सध्या नगरपरिषदेच्या जागेत असलेल्या ठिकाणाहूनच पंचायत समितीचा कारभार चालू द्यावा, अशी मागणी होत आहे. मूळ जागा जिल्हा परिषदेची आहे, परंतु मालकी रेकाॅर्डला नगरपरिषदेचे नाव आहे. ही जागा सोडण्याच्या बदल्यात पशू उपचार केंद्र व त्याच्या शेजारी असलेल्या शेडपर्यंतची जागा मिळून मोठी जागा पंचायत समितीला उपलब्ध होऊ शकते. आमदारांनी त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही होत आहे.