नाट्यगृहाचे काम त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:10 IST2021-01-01T04:10:22+5:302021-01-01T04:10:22+5:30

महापालिका आयुक कैलास जाधव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा प्रशासनाकडून देवळालीगाव सत्कार पाइंट येथे २० वर्षांपूर्वी ...

Get the theater work done right away | नाट्यगृहाचे काम त्वरित सुरू करा

नाट्यगृहाचे काम त्वरित सुरू करा

महापालिका आयुक कैलास जाधव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा प्रशासनाकडून देवळालीगाव सत्कार पाइंट येथे २० वर्षांपूर्वी महात्मा गांधी सभागृह हे नाट्यगृह उभारले होते. मात्र बांधकामात झालेल्या चुका व अपुरी आसन व्यवस्था यामुळे हे सभागृह हे नाट्यगृह म्हणून कलाकारांच्या पचनी पडले नाही. नाशिकरोड व परिसरात मोठ्या प्रमाणात कलाकार व रसिक आहेत. मात्र, नाशिकरोडला नाट्यगृह नसल्याने त्या सर्वांची गैरसोय होत आहे. तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून बिटको चौकाजवळ महापालिका प्रशासनाला नाट्यगृहासाठी जागा व शासनाकडून निधीही मिळाला. महापालिका प्रशासनाने नाट्यगृह उभारणीस मंजुरी दिली आहे. मात्र, अद्यापी काम सुरू झालेले नाही. रसिक व कलाकारांना यामुळे व्यासपीठ उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. महापालिकेने हे नाट्यगृह उभारणीस त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी निवेदनात आहे. निवेदनावर नगरसेविका डॉ. सीमा ताजणे, राजेंद्र ताजणे, रमेश पाळदे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Get the theater work done right away