शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

बाहेर व्हा... इन्स्पेक्शन सुरू आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:45 AM

जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्यावर असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारी तीनच्या सुमारास इन्स्पेक्शन सुरू असल्याचे सांगत तेथील शिपाई वर्गाने आलेल्या शिक्षकांना कक्षाबाहेर पिटाळले, तर काहींना थेट वरच्या मजल्यावर जा किंवा खाली निघून जा सांगत कक्ष मोकळा करून घेतला. यामुळे आलेल्या शिक्षकांना वाट पाहावी लागली, तर मिळालेल्या वागणुकीवरून काही शिक्षकांनी नाराजीही व्यक्त केली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्यावर असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारी तीनच्या सुमारास इन्स्पेक्शन सुरू असल्याचे सांगत तेथील शिपाई वर्गाने आलेल्या शिक्षकांना कक्षाबाहेर पिटाळले, तर काहींना थेट वरच्या मजल्यावर जा किंवा खाली निघून जा सांगत कक्ष मोकळा करून घेतला. यामुळे आलेल्या शिक्षकांना वाट पाहावी लागली, तर मिळालेल्या वागणुकीवरून काही शिक्षकांनी नाराजीही व्यक्त केली.  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारच्या  सुमारास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैशाली झनकर यांना भेटण्यासाठी जिल्ह्णातील अनेक भागांतील शिक्षक आले होते, तर काही प्रकरणांची सुनावणी असल्याने सुनावणीसाठीही शिक्षक आलेले होते. परंतु विभागीय आयुक्तालयातून अधिकारी इन्स्पेक्शनला आल्याचे सांगत आलेल्या शिक्षकांना खाली निघून जाण्यास सांगण्यात आले. शिक्षण विभागात मॅडमची भेट घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला कार्यालयातून काहीवेळ निघून जाण्यास सांगण्यात आले.  इन्स्पेक्शन सुरू आहे तसेच विभागीय आयुक्तालयातील अधिकारी आले आहेत हे सर्व मान्य असले तरी आलेल्या अभ्यागतांना कक्ष खाली करण्यास सांगण्याचा उद्देश मात्र कुणाच्याही लक्षात आला नाही. नेमके असे का करण्यात आले आणि त्यामागची भूमिका काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र आलेल्या शिक्षकांना मिळू शकले नाही. याबाबतची नाराजी या शिक्षकांनी उघड व्यक्त केली नसली तरी आपसांतील कुजबूज मात्र लपून राहिली नाही.  दरम्यान, या संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकाºयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.याप्रकरणी चौकशी केली असता विभागीय आयुक्तालय कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त सुखदेव बनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या कामकाजाची पाहणी केल्याचे समजले. सुमारे तासभर त्यांनी कामकाजाची पाहणी करून फाइल्सचीही तपासणी केली. परंतु हे इन्स्पेक्शन नियमित होते की त्याला काही विशेष कारण हे मात्र समजू शकले नाही.  प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकाºयांना भेटण्यासाठी येणाºयांची संख्या मोठी असते. सकाळापासून जिल्हाभरातील अनेक शिक्षक येथे येतात. त्यांची कामे होईपर्यंत कित्येकदा त्यांना सायंकाळपर्यंत वाट पाहावी लागते. मंगळवारी अनेक शिक्षकांना अशीच वाट पाहावी लागली. बसण्याची व्यवस्थाच नाहीआलेल्या शिक्षकांना बसण्यासाठी येथे व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेहमीच कार्यालयाच्या आवारात गर्दी दिसते. काही शिक्षक तेथेच मांडी घालतात, तर काही शिक्षक कार्यालयाबाहेरील जिन्यांच्या पायºयांवर बसतात. शिक्षकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असती तर असे कितीही इन्स्पेक्शन झाले असते तरी शिक्षकांची गैरसोय टळली असती.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र