जिओ क्रि केट स्पर्धेत नवकार अजिंक्य

By Admin | Updated: May 25, 2014 20:37 IST2014-05-25T20:33:53+5:302014-05-25T20:37:32+5:30

नाशिक : जैन इंटरनॅशनल युथ ऑर्गनायझेशन (जिओ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत नवकार ११ संघाने नमो ११ चा २० धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले़

Geo Kri Kate Tournament Navarangi Ajinkya | जिओ क्रि केट स्पर्धेत नवकार अजिंक्य

जिओ क्रि केट स्पर्धेत नवकार अजिंक्य


नाशिक : जैन इंटरनॅशनल युथ ऑर्गनायझेशन (जिओ) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत नवकार ११ संघाने नमो ११ चा २० धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले़
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला होता़ साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत काल नमो ११, जिओ ११, नवकार ११, मिडटाऊन ११ या संघांनी आपले सामने जिंकत तसेच गुणफ रकाच्या जोरावर उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता़ आज झालेल्या उपांत्य सामन्यात नवकार ११ संघाने जिओ संघाचा, तर नमो ११ संघाने मिडटाऊन संघाचा पराभव करत अंतिम फे रीत प्रवेश केला होता़ अंतिम सामन्यात प्रथम फ लंदाजी करताना नवकार संघाने निर्धारित दहा षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात ६३ धावा केल्या़ उत्तरादाखल मैदानात उतरलेला नमो ११ संघ आठ गडी गमावूनही निर्धारित षटकांत केवळ ४३ धावा करू शकला़ यामध्ये नवकार ११ ला २० धावांनी विजय मिळाला़
दुपारी झालेल्या बक्षीस वितरण समारंभात अशोका बिल्डकॉनचे संचालक सतीश पारख, जितोचे अध्यक्ष वर्धमान लुंकड यांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले़ यावेळी जिओचे अध्यक्ष क्षम्यक सुराणा, अमित बाफणा, हर्षित पहाडे, नयन भंडारी, जितेंद्र शाह, सुनील साखला आदि उपस्थित होते़

Web Title: Geo Kri Kate Tournament Navarangi Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.