सेनेचे गुलाबराव पाटील यांचा सरकारला घरचा अहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:02 IST2018-09-21T12:59:52+5:302018-09-21T13:02:28+5:30
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधन दरवाढीबाबत बोलताना पाटील यांनी, पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहात असून, सरकारने केवळ पेट्रोलचे दरच बदलले नाहीत

सेनेचे गुलाबराव पाटील यांचा सरकारला घरचा अहेर
नाशिक : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत चालले असून, जनतेच्या मनात सरकार विषयी तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे, परंतु सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही, उलट पेट्रोल शंभरी पार करेल अशी सरकारलाच आशा वाटत असल्याने जनतेने येत्या निवडणुकीत मतदान या शस्त्राचा वापर करून जागा दाखवून द्यावी अशा शब्दात शिवसेनेचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप सरकारवर टिका केली. अन्य राज्ये इंधनावरील भार कमी करीत असताना राज्य सरकारनेही हा भार कमी करावा असा सल्लाही त्यांनी दिला.
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधन दरवाढीबाबत बोलताना पाटील यांनी, पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहात असून, सरकारने केवळ पेट्रोलचे दरच बदलले नाहीत तर पंपावर लावलेले पोस्टर्सही बदलले आहेत. पुर्वी पोस्टर्सवर एक म्हातारीचे चित्र होते, त्याची जागा आता तरूण मॉडेलने घेतली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पेट्रोलचे भाव आणखी वाढतील त्याचे हे संकेत असल्याचे भाकित पाटील यांनी केले. इंधन दरवाढीबाबत शिवसेना विरोधी पक्षात होती तेव्हाही आंदोलन करीत होती व आत्ताही करीत आहे, परंतु त्यावेळी विरोधात असल्याने आंदोलन करणाºया भाजपाने सत्तेवर येताच, इंधन दरवाढीचे आंदोलन विसरली आहे असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराच्य दरवेळी होणाºया चर्चेबाबत पाटील यांना छेडले असता, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. ते म्हणाले ‘मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण आहेत, पंचागांचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. कोणत्या राहू-केतुची शांती करायची ते पाहतील’असे सांगून या संदर्भातील वृत्त फक्त चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.