शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

झिरवाळांकडून गावित यांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:48 PM

दिंडोरी- पेठ मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर गावित यांना 60542 मतांनी पराभूत करुन विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी गड कायम राखला आहे.

दिंडोरी : दिंडोरी- पेठ मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर गावित यांना 60542 मतांनी पराभूत करुन विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी गड कायम राखला आहे.  तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असताना माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासोबत त्यांचे समर्थकही शिवसेनेत दाखल झाल्याने तालुक्यात शिवसेना प्रबळ दावेदार मानले जात ैहोते. मात्र सरळ लढतीत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांना पराभूत करण्याचे शिवसेनेचे मनसुबे निकालानंतर सपशेल खोटे ठरले.शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. लोकसभेला राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार धनराज महाले स्वगृही परतले तर माजी आमदार रामदास चारोस्कर हेही सेनेत आले. सुरुवातीला महाले यांनी उमेदवारी मिळविली मात्र त्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे यांनी विरोध करत उमेदवारी बदल करण्यात यश मिळवले. दोन्ही माजी आमदारांच्या स्पर्धेत पेठचे तालुकाप्रमुख भास्कर गावित यांना उमेदवारी मिळाली. दिंडोरीत पूर्व भागातील शिवसेनेचे परंपरागत मते मिळतील ही शिवसेनेची आशा मतदारांनी फोल ठरवत पेठ तालुक्यात शिवसेनेला अल्पशी आघाडी दिली मात्र दिंडोरीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत राष्ट्रवादीला भरभरून मते देत शिवसेनेचे गणित बिघडवले. चारोस्कर व महाले हे जरी शिवसेनेसोबत राहिले मात्र त्यांच्या समर्थकांनी उघड राष्ट्रवादीला साथ देत नाराजी मतदानातून व्यक्त केली. सरळ लढतीतील धोका ओळखत राष्ट्रवादीचे आमदार झिरवाळ यांनी माकपाचा उमेदवार न देता त्यांचा पाठींबा घेत शिवसेनेला पेठसोबत दिंडोरीच्या पूर्व भागात रोखण्याचा डाव यशस्वी करत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला.विजयाची तीन कारणे...आमदार नरहरी झिरवाळ यांची साधी राहणी तसेच पेठ व दिंडोरी तालुक्यातील जनतेशी असलेला सततचा संपर्क, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका.मांजरपाडा वळण योजना, लघु पाटबंधारे आदी दीर्घकालीन फायद्याच्या योजना केल्याने जनतेत कामाचा माणूस म्हणून प्रतिमा.माकपा व माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले यांच्या नाराज समर्थकांची मिळालेली मदत तसेच मतदारसंघात केलेली विकासकामे हिताची ठरली.गावितांच्या पराभवाचे कारण...उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो पुन्हा बदलल्याने माजी आमदार धनराज महाले यांच्या समर्थकांची तसेच इच्छूक उमेदवार रामदास चारोस्कर यांच्या समर्थकांची साथ मिळविण्यात अपयश, होमपीच असलेल्या पेठ तालुक्यातून तसेच खेडगाव, मोहाडी गटातून मिळालेला अल्प प्रतिसाद.दिंडोरी-पेठ अशा प्रादेशिक अस्मितेच्या मुद्यासोबतच अगोदर घोषित शिवसेनेची उमेदवारी नंतर बदलली गेल्याने त्यातून उद्भवलेल्या नाराजीचा लाभ उचलत झिरवाळ यांनी विजयश्री गाठली.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ भास्कर गावित शिवसेना 63542२ अरु ण गायकवाड वंचित ब. आ. 13436३ टी. के. बागुल मनसे 3137४ जना वतार बसपा 2015

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dindori-pcदिंडोरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक