तळवाडे येथे नार-पारसंदर्भात गावसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 17:47 IST2019-01-02T17:47:14+5:302019-01-02T17:47:26+5:30
साकोरा - सद्या पहाटेच्या एवढ्या कडाक्याच्या थंडीत तालुक्यातील विविध गावांपर्यंत ९०कि .मी चा मोटारसायकलीवरून प्रवास करून पाणीप्रश्नाचा जागर घालीत फिरणारे नार-पार समितीचे कार्यकर्ते तरु णांसाठी आदर्श ठरले आहेत.

तळवाडे येथे नार-पारसंदर्भात गावसभा
साकोरा - सद्या पहाटेच्या एवढ्या कडाक्याच्या थंडीत तालुक्यातील विविध गावांपर्यंत ९०कि .मी चा मोटारसायकलीवरून प्रवास करून पाणीप्रश्नाचा जागर घालीत फिरणारे नार-पार समितीचे कार्यकर्ते तरु णांसाठी आदर्श ठरले आहेत.अशी प्रतिक्रि या पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष सुभाष कुटे यांनी नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथे झालेल्या नार-पारच्या गावसभेत बोलताना व्यक्त केली. तत्पूर्वी पळाशी येथील गावसभेत प्रकाश आव्हाड या तरु णाने सबंध तालुका दुष्काळाने होरपळणारा आणि पाटचारी वाचून उध्वस्त होणारा पळाशीचा बळीराजा यापुढे नार-पार च्या लढ्यात उतरून अन्यायाचे जोखड फेकल्याशिवाय राहणार नांही असा निर्धार टाळ्यांच्या गजरात केला.
तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीने तालुक्यातील गावोगावी जाऊन गावसभेतून जलजागर सुरु केला आहे. याच अभियानांतर्गत पळाशी आणि तळवाडे या गावांमध्ये गाव सभांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी दिल्लीत गेलेल्या काँग्रेस पक्षाच्या पथकाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नार-पार संदर्भात जे आश्वासन दिले होते तेच आश्वासन यावर्षी गेलेल्या भाजपाच्या किसान पथकाला दिले आहे. याचा अर्थ वर्षभरात कोणतीही प्रगती झाली नसल्याचे दिसून येत आहे.